Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या दिमतीला व्हॅनिटी व्हॅन, व्हॅनिटीतूनच मुंबईला येणार; काय आहेत सुविधा?

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या दिमतीला व्हॅनिटी व्हॅन, व्हॅनिटीतूनच मुंबईला येणार; काय आहेत सुविधा?

| Updated on: Jan 19, 2024 | 2:38 PM

20 जानेवारीला सकाळी 9.00 वाजता अंतरवाली सराटीपासून पद यात्रा सुरू होईल. दुपारी कोळगाव, ता. गेवराई येथे भोजन आणि मातोरी, ता. शिरूर येथे रात्री मुक्काम असणार आहे. लाखो मराठा समाज बांधव देखील यामध्ये वेगवेगळ्या वाहनांनी सहभागी होणार

मुंबई, १९ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील हे उद्या 20 जानेवारी रोजी सकाळी जालन्यातील आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कुच करणार आहेत. 20 जानेवारीला सकाळी 9.00 वाजता अंतरवाली सराटीपासून पद यात्रा सुरू होईल. दुपारी कोळगाव, ता. गेवराई येथे भोजन आणि मातोरी, ता. शिरूर येथे रात्री मुक्काम असणार आहे. लाखो मराठा समाज बांधव देखील यामध्ये वेगवेगळ्या वाहनांनी सहभागी होणार असून या प्रवासादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी बीडमधील मराठा आंदोलक पुढे सरसावले आहेत. बीड येथील मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला जाण्याच्या प्रवासासाठी खास व्हॅनिटी व्हॅन सज्ज ठेवली आहे. या व्हॅनमध्ये नेमक्या काय सुविधा आहेत. बघा व्हिडीओ…

Published on: Jan 19, 2024 02:38 PM