ही शेवटची लढाई.... अंकात काळजात कवटाळून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने अन् अश्रूंचा बांध फुटला

ही शेवटची लढाई…. अंकात काळजात कवटाळून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने अन् अश्रूंचा बांध फुटला

| Updated on: Jan 21, 2024 | 10:47 AM

मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. अंतरावाली सराटीतून या पायी मोर्च्याला निघताना मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. पायी मोर्चाच्या पहिला दिवस कसा होता? जाणून घ्या... बघा स्पेशल रिपोर्ट... कुटुंबातील कुणी काय भावना व्यक्त केल्यात?

मुंबई, २१ जानेवारी २०२४ : घोषणा केल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. अंतरावाली सराटीतून या पायी मोर्च्याला निघताना मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. पायी मोर्चाच्या पहिला दिवस कसा होता? जाणून घ्या… मुंबईच्या दिशेकडे रवाना होताना मराठ्यांसाठी आरक्षण घेऊनच येणार असा निर्धारच जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आणि ते अंतरवाली सराटीतून मार्गस्थ झाले. लाठीचार्जच्या घटनेपासून जरांगे पाटील हे अंतरवालीतच होते. मात्र पायी मोर्च्याच्या निमित्ताने त्यांची कुटुंबीयांशी भेट झाली. तीन मुली आणि एक मुलगा आणि पत्नीला अश्रू अनावर झाले. जरांगे पाटील यांच्या पत्नीने वाटेतच औक्षण केलं. यापुढेही जरांगेंच्या आंदोलनाला कायम साथ देणार अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्यात. बघा स्पेशल रिपोर्ट… कुटुंबातील कुणी काय भावना व्यक्त केल्यात?

Published on: Jan 21, 2024 10:47 AM