पप्पा तुम्ही फक्त... पोटच्या गोळ्यांची आर्त हाक, पोरांना पोटाशी कवटाळताच मनोज जरांगे यांना गलबलून आलं

पप्पा तुम्ही फक्त… पोटच्या गोळ्यांची आर्त हाक, पोरांना पोटाशी कवटाळताच मनोज जरांगे यांना गलबलून आलं

| Updated on: Jan 20, 2024 | 4:13 PM

मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना पूर्ण गाव भावूक झाल्याचे पाहायला मिळाले तर ठिक-ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं. मराठ्यांसह निघालेल्या मनोज जरांगे यांचा पायी मोर्चा जालन्याच्या शहागड गावात पोहोचताच भावूक क्षण पाहायला मिळाला

जालना, २० जानेवारी २०२४ : अंतरवाली सराटी या गावातून आज सकाळी मनोज जरांगे पाटील मोठ्या मराठ्यांच्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या पायी मोर्च्याला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील भावनिक होऊन म्हणाले, मी परत येईल की नाही माहिती नाही. पण मराठ्यांनी कायम एकजूटीने रहा, आपले विचार जीवंत ठेवा आणि मराठा आरक्षणाची लढाई काय ठेवा असे आवाहनही त्यांनी केलं. मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना पूर्ण गाव भावूक झाल्याचे पाहायला मिळाले तर ठिक-ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं. मराठ्यांसह निघालेल्या मनोज जरांगे यांचा पायी मोर्चा जालन्याच्या शहागड गावात पोहोचताच भावूक क्षण पाहायला मिळाला. मनोज जरांगे यांचं संपूर्ण कुटुंब जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी तेथे दाखल झालं होतं. मनोज जरांगे यांच्या पत्नी, तीन मुली आणि मुलगा यांनी मनोज जरांगे पाटील यांना घट्ट मिठी मारली आणि मराठा आरक्षण घेऊनच या असा धीर दिला. बघा मनोज जरांगे पाटील यांना बघताच गहिवरलेल्या मुलांनी काय भावना व्यक्त केल्यात?

Published on: Jan 20, 2024 04:13 PM