नादखुळा! मनोज जरांगे पाटील यांचा जबरा फॅन, थेट छातीवर गोंदून घेतला टॅटू
मनोज जरांगे पाटील यांचे फॅन आणि फालोअर्स सर्वाधिक वाढले. तर तरूणाई वर्गात मनोज जरांगे पाटील यांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच लातूर जिल्ह्यातील भरत पवार या तरुणाने थेट मनोज जरांगे पाटील यांचा टॅटू चक्क आपल्या छातीवर गोंदून घेतला आहे.
जालना, २ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण लढा सूरु केला आणि या लढ्याच्या माध्यमातून जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहचले. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे फॅन आणि फालोअर्स सर्वाधिक वाढले. तर तरूणाई वर्गात मनोज जरांगे पाटील यांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच लातूर जिल्ह्यातील भरत पवार या तरुणाने थेट मनोज जरांगे पाटील यांचा फोटो स्वरूपातील टॅटू चक्क आपल्या छातीवर गोंदून घेतला आहे. यावेळी त्यांच्याशी टीव्ही ९ मराठीने संवाद साधला असता भरत पवार या मराठा तरूणाने असे सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांचा सच्चेपणा मनाला भावला त्यामुळे हा टॅटू छातीवर काढला आणि हा टॅटू मरेपर्यंत आपल्या छातीवर राहिल असेही त्याने म्हटले.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

