… म्हणून गाडी फोडली, गुणरत्न सदावर्ते यांना इशारा तर जरांगे पाटील यांच्या अटकेची सदावर्तेंची मागणी
tv9 Marathi Special Report | मंगेश साबळे आणि इतर 2 तरुणांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली. मात्र यावरुन सदावर्तेंनी जरांगेंच्याच अटकेची मागणी केली. तर सदावर्तेंच्या टीकेची भाषा पाहता, चाप बसवण्यासाठी धडा शिकवल्याचं मंगेश साबळेंनी म्हटलंय
मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंच्या 2 गाड्या मराठा तरुणांनी फोडल्या. मंगेश साबळे आणि इतर 2 तरुणांनी ही तोडफोड केली. मात्र यावरुन सदावर्तेंनी जरांगे पाटलांच्याच अटकेची मागणी केली. तर सदावर्तेंच्या टीकेची भाषा पाहता, चाप बसवण्यासाठी धडा शिकवल्याचं मंगेश साबळेंनी म्हटलं आहे. सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या मराठा तरूणांनी सदावर्तेंच्या दोन्ही गाड्यांवर हल्ला केला. यावेळी त्यांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत, मंगेश साबळे आणि इतर तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली. गाड्यांच्या तोडफोड प्रकरणात तिघांना अटक झाली. मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू साठे आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल झालाय. या तिघांनाही भोईवाडा पोलिसांनी शिवडी न्यायालयात हजर केलं. न्यायालयाकडून 5 हजारांच्या जातमुचलक्यावर तिघांची सुटका झाली. गेल्या काही दिवसांत सदावर्तेंनी जरांगे आणि त्यांच्या आंदोलनावर टीका केली होती. त्यावरुनच सदावर्तेच्या गाड्यांना मराठा तरुणांनी टार्गेट केलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट