नांदेडच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा नव्हता, मनुष्यबळ होतं तरीही रूग्णाचा मृत्यू? हसन मुश्रीफ म्हणाले…
VIDEO | नांदेडच्या शासकीय रूग्णालयात २४ तासात २४ रुग्ण मृत्यू झाल्याच्या राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. नांदेड रूग्णालयातील या घटनेवरून राजकीय वर्तुळात विरोधकांकडून राज्य सरकारवर आरोप करण्यात येत आहे. या आरोपादरम्यान, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे
नांदेड, ३ ऑक्टोबर २०२३ | नांदेडच्या शासकीय रूग्णालयात गेल्या २४ तासात २४ जणांचा बळी गेल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या घटनेनंतर राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवले जात आहे. यावर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफ म्हणाले, घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. कोणत्याही अपघातानंतर रुग्णाला सरकारी रुग्णालयात आणलं जातं. खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जात नाही. खासगी रुग्णालयात उपचार घेताना बिल भरण्यासारखी परिस्थिती नसेल, तर त्यांना सरकारी रुग्णालयात आणलं जातं. नेमकं काय घडलं? त्याची चौकशी होईल. मी सुद्धा जाणार आहे असं हसन मुश्रीफ म्हणाले. तर नांदेडच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा नव्हता, मनुष्यबळ होतं, डॉक्टर होते, प्रत्येक मृत्यूची चौकशी करण्यात येणार आहे, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
Published on: Oct 03, 2023 03:32 PM
Latest Videos