शरद पवारांच्या भेटीनंतर शिंदे तात्काळ फडणवीसांच्या ‘सागर’वर, मराठा आरक्षणासंदर्भात काय झाली चर्चा?
येत्या काही दिवसांत पुन्हा सर्वपक्षीय बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे विरोधकांना निमंत्रण देणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान, सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र ऐनवेळी मविआ नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला. यानंतर सताधाऱ्यांच्या निशाण्यावर शरद पवार आलेत.
ओबीसीमधून सरसकट मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरूवात होऊन तीन दिवस झालेत. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा…आणि तिसरीकडे शरद पवार यांनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात २० मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे तात्काळ देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पवार आणि शिंदे यांच्यात मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावरून जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी दोघांमध्ये चर्चा झाली. येत्या काही दिवसांत पुन्हा सर्वपक्षीय बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे विरोधकांना निमंत्रण देणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान, सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र ऐनवेळी मविआ नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला. यानंतर सताधाऱ्यांच्या निशाण्यावर शरद पवार आलेत. बघा यासंदर्भात स्पेशल रिपोर्ट