Mhada Lottery 2023 : मुंबईत २०१८ नंतर म्हाडाची मोठी लॉटरी, सर्वात स्वस्त घर कुठंय?

Mhada Lottery 2023 : मुंबईत २०१८ नंतर म्हाडाची मोठी लॉटरी, सर्वात स्वस्त घर कुठंय?

| Updated on: May 23, 2023 | 10:28 AM

VIDEO | मुंबई म्हाडाच्या लॉटरीतील घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सर्वात स्वस्त अन् महागडं घर कुठंय माहितीये?

मुंबई : मुंबईत २०१८ नंतर म्हाडाची सर्वात मोठी लॉटरी निघाली आहे. म्हाडाच्या लॉटरीतील घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. म्हाडाच्या लॉटरीतील सर्वात महागडं घर ७ कोटी ५८ लाखांचं आहे आणि ते ताडदेव भागात आहे. तर स्वस्त घर २५ लाखांचं हे चांदिवली भागात आहेत. म्हाडा म्हणजे सर्वसामान्यांना परवडणारी घरं…असं ब्रीद वाक्य असणाऱ्या संस्थेने आता न परवडणारी घरं केल्यास त्यात काही नवल नाही. मुंबई ज्या लॉटरीची डोळे लावून वाट पाहत असतात ती लॉटरी जाहीर झालीये. मात्र घराचे भाव बघून सामान्यांचे स्वप्न भंगल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दीड वर्षात त्याच घरांची किंमत ११ लाखांनी महाग झालीत. मोजक्या स्कीम सोडल्या तर उत्पन्न गट आणि घरांच्या किंमतीत मोठा गोंधळ आहे. म्हणजेच अल्प गटासाठी म्हाडाने ज्या घराच्या किंमती निर्धारित केल्यात त्याचा कोणताच हिशेब लागत नाहीये.

Published on: May 23, 2023 10:28 AM