लाथ मारण्याची गरज नाही… भुजबळांनी शिंदेंच्या आमदारांना ठणकावून सांगत काय केला मोठा गौप्यस्फोट?
१६ नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असा मोठा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. लाथ मारण्याची गरज नाही, राजीनामा दिलाय असे म्हणत छगन भुजबळ यांनी शिंदे गटाच्या आमदारांना ठणकावून सांगत जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई, ४ फेब्रुवारी, २०२४ : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लाथ मारुन मंत्रिमंडळातून काढू टाकण्याची मागणी केली. यावर शनिवारी नगर येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देत एक मोठा गौप्यस्फोट केला. १६ नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असा मोठा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. लाथ मारण्याची गरज नाही, राजीनामा दिलाय असे म्हणत छगन भुजबळ यांनी शिंदे गटाच्या आमदारांना ठणकावून सांगत जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘पहिली ओबीसी रॅली १७ नोव्हेंबरला अंबड येथे झाली. त्याआधी १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता असे सांगत भुजबळांनी मला लाथ मारण्याची गरज नाही मी आधीच राजीनामा दिला’, असं वक्तव्य भर सेभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
Published on: Feb 04, 2024 10:18 AM
Latest Videos