भुजबळांचा पिस्तुल टाकण्याचा धंदा? जरांगे पाटील यांच्या टीकेवर भुजबळ यांनी काय दिलं प्रत्युत्तर?

भुजबळांचा पिस्तुल टाकण्याचा धंदा? जरांगे पाटील यांच्या टीकेवर भुजबळ यांनी काय दिलं प्रत्युत्तर?

| Updated on: Jan 15, 2024 | 1:31 PM

बीडच्या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलंय. तर याला मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर जोरदार पलटवार करत हल्लाबोल केलाय. बीडमध्ये झालेल्या जाळपोळीवरूनही भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय

मुंबई, १५ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वार पलटवार सुरूच आहे. बीडच्या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलंय. तर याला मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर जोरदार पलटवार करत हल्लाबोल केलाय. बीडमध्ये झालेल्या जाळपोळीवरूनही भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय. जरांगे पाटील यांच्या गुंडांनी बीडमध्ये जाळपोळ केल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय. तर या आरोपावर पलटवार करत मनोज जरांगे पाटील म्हणाले, भुजबळांच्या पाहुण्यांनीच बीडमधील घरांची जाळपोळ केली. दरम्यान, मुंबईत जाणार आणि मराठ्यांना आरक्षण घेऊन येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर मराठ्यांचा गनिमी कावा असतो, हे सर्वांना कळेल असा इशारच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. बघा काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

Published on: Jan 15, 2024 01:31 PM