‘सेना-भाजप एकत्र सत्ता स्थापन करणार हे संजय राऊतांनी लिक केलं’
शिवसेना आणि भाजप एकत्र सत्ता स्थापन करणार ही बातमी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लिक केली, असं वक्तव्य करत मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.
मुंबई, २२ डिसेंबर २०२३ : शिवसेना आणि भाजप एकत्र सत्ता स्थापन करणार ही बातमी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लिक केली, असं वक्तव्य करत मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावेळी संजय राऊत गप्प राहिले असते तर युतीत फूट पडली नसती, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. केसरकर असे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार होते. ही बातमी लिक करण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. त्यांनी शरद पवार यांना ही बातमी सांगितली. त्यामुळे ही युती होऊ शकली नाही.’, असेही दीपक केसरकर यांनी म्हटलं.
Published on: Dec 22, 2023 04:45 PM
Latest Videos
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

