ज्याला कर नाही त्याला डर का? दीपक केसरकर यांचा रोख नेमका कुणावर?
मुंबई महापालिकेचे गेल्या २५ वर्षांपासूनचं ऑडिट करण्यात येणार असून या या ऑडिटसाठी शिंदे सरकारकडून 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या संदर्भातील मोठी घोषणा शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी आज केली आहे. यावरून मंत्री दीपक केसरकर यांचं भाष्य
नागपूर, १२ डिसेंबर २०२३ : मुंबई महानगर पालिकेचे गेल्या २५ वर्षांपासूनचं ऑडिट करण्यात येणार आहे. या ऑडिटसाठी शिंदे सरकारकडून 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या संदर्भातील मोठी घोषणा शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी आज केली आहे. यावरून शिंदे गट शिवसेनेचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही जर स्वच्छ असाल तर तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. तसेच एखाद्या ऑथरिटीवर आपण बेछूट आरोप करतोय त्यावर रिअॅक्शन येते, हे लक्षात घेतलं पाहिजे, असं म्हणत केसरकर यांनी इशारा दिला आहे. शिवसेनेची घटना काय सांगते, आम्ही कॉमन सिव्हिल कोडचं पालन करू, असं घटनेत लिहिलंय. तर यावर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनीही भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे. बघा काय केली सडकून टीका…?
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

