Sadabhau Khot : ... तेव्हा ते काय गांजा ओढत होते का? गोटया खेळत होते का? सदाभाऊ खोत यांच्या कुणावर रोख?

Sadabhau Khot : … तेव्हा ते काय गांजा ओढत होते का? गोटया खेळत होते का? सदाभाऊ खोत यांच्या कुणावर रोख?

| Updated on: Oct 15, 2023 | 10:27 AM

VIDEO | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट प्रस्थापित मराठ्यावर रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल, गेली ७० वर्ष प्रस्थापित मराठे सत्तेवर होते. तेव्हा का मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. तेव्हा काय हे लोक गांजा ओढत होते का?

सातारा, १५ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात संवाद यात्रा काढली होती. काल जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात जरांगे पाटील यांच्या सभेची सांगता झाली. यावेळी त्यांनी सरकारला थेट इशारा देत मराठ्यांना आरक्षण द्या, शेवटची १० दिवस शिल्लक असल्याचे म्हणत अल्टिमेटम दिलं. यावरूनच रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय. गेली ७० वर्ष प्रस्थापित मराठे सत्तेवर होते. तेव्हा का मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. तेव्हा काय हे लोक गांजा ओढत होते का? गोट्या खेळत होते का? असा सवाल आक्रमक होत सदाभाऊ खोत यांनी केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांची कोंडी केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी मराठा आरक्षणाचं हत्यार उपसलं गेलं आहे, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी दावा केला आहे.

Published on: Oct 15, 2023 10:27 AM