Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उचकवण्याच्या टीकेवर शिंदे गटातील मंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, कुणी कुणाला…
VIDEO | जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला असून आता तुमच्याकडे फक्त 10 दिवस असल्याचे म्हटले आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. यावर मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलं.
मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली. या सभेला राज्यभरातील मराठा समाजातील बांधव आले होते. मनोज जरांगेंच्या सभेला जणू भगवं वादळच रस्त्यावर उतरलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिकाच जरांगेंनी घेतली. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला असून आता तुमच्याकडे फक्त 10 दिवस असल्याचे म्हटले आहे. तर आता एक तर विजय यात्रा निघेल नाही तर माझी अंत्ययात्राच निघेल असे म्हणत जरांगे पाटलांना थेट इशाराच सरकारला दिला आहे. यावेळी त्यांनी मराठ्यांना शांततेच्या मार्गानं राहण्याचं आवाहन केलं. कुणीही कितीही उचकवलं तरी शांतच राहायचं सरकारचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोणी कोणाला उचकवायचे काम करत नाहीत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिलेले वाचन पूर्ण करण्यावर भर देत आहे. सरकार त्याचं काम करत आहेत.