‘Sachin Tendulkar ने भारतरत्न परत करावा, भारतरत्न परत दिला नाही, तर…’, बच्चू कडू यांनी काय दिला इशारा?
मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे थेट भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याची चर्चा सध्या होताना दिसतेय. अशी घोषणाही बच्चू कडू यांनी केली. सचिन तेंडूलकर करत असलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती करण्यावर बच्चू कडू यांनी आक्षेप नोंदविला आहे. बच्चू कडे याप्रकरणी आक्रमक होत म्हणाले, ‘भारतरत्न सचिन तेंडूलकर यानं […]
मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे थेट भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याची चर्चा सध्या होताना दिसतेय. अशी घोषणाही बच्चू कडू यांनी केली. सचिन तेंडूलकर करत असलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती करण्यावर बच्चू कडू यांनी आक्षेप नोंदविला आहे. बच्चू कडे याप्रकरणी आक्रमक होत म्हणाले, ‘भारतरत्न सचिन तेंडूलकर यानं ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती कराव्यात किंवा करू नयेत याच्या काही आचारसंहिता आहेत. त्यामुळे फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरूणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडलं जात असेल तर त्याचा आम्ही विरोध करू’. त्यामुळे बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकर यांनं भारतरत्न परत करण्याची भूमिका मांडली आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी आपल्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून आता त्यांनी सचिन तेंडुलकर यांनं भारतरत्न पुरस्कार परत करावा आणि पुरस्कार परत नाही केला तर मोठं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.