मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?

मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?

| Updated on: May 14, 2024 | 1:41 PM

मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान होणार आहे. राज्यातील चार जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे. मात्र आता मुंबई आणि नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या लगोलग आता महाराष्ट्रात विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान होणार आहे. राज्यातील चार जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे. मात्र आता मुंबई आणि नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. विविध शिक्षक संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या १० जूनला होणारी पदवीधर निवडणूक १५ जूननंतर घेण्याची मागणी या विविध शिक्षक संघटनांनी केली आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर शिक्षक-पदवीधर निवडणूक आयोगाकडून ठरलेल्या दिवशी होणार की पुढे ढकलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: May 14, 2024 01:40 PM