‘महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी जनतेच्या मनातील…’, राज ठाकरेंच्या वाढदिवसापूर्वीच जोरदार बॅनरबाजी
महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री... मुंबईतील शिवाजीपार्क येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर हिंदुत्वाचा विघ्नहर्ता असा उल्लेखही मनसे कार्यकर्त्यांनी बॅनरवर केलाय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या शुक्रवारी म्हणजेच १४ जून रोजी वाढदिवस आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आतापासूनच जोरदार बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनरवरील एकच लाईन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ती म्हणजे, महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री… मुंबईतील शिवाजीपार्क येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर हिंदुत्वाचा विघ्नहर्ता असा उल्लेखही मनसे कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर केला आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर आणि शुभेच्छा विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्याकडून राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर लावण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या वाढदिवसापूर्वीच दादर परिसरात सध्या या बॅनरची चांगलीच चर्चा आहे. तर राज ठाकरेंनी नुकतंच एक ट्विट केले आहे. ‘दरवर्षी १४ जूनला वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, केक , मिठाई किंवा भेटवस्तू घेऊन येतात. पण ह्यावर्षीपासून तुम्हाला मनापासून विनंती आहे की,कृपया पुष्पगुच्छ, केक , मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. आपली भेट हिच माझ्यासाठी भेट आहे’, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.