Raj Thackerayनी कार्यकर्त्याच्या खांद्याला मलम चोळलं! , अविनाश जाधव यांच्याकडून व्हिडीओ शेअर
साहेब हात खूप दुखतोय, असं मनसेच्या मनोज चव्हाण (Manoj Chavhan) यांनी राज ठाकरेंच्या समोर म्हटल्यानंतर राज ठाकरेंना राहावलं नाही. त्यांनी थेट मनोज चव्हाण यांना मलम लावून आपल्या कार्यकर्त्याची काळजी घेतली. मनोज चव्हाण यांना मलम लावतानाचा व्हिडीओ ठाणे-पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी फेसबुकवर पोस्ट केलाय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांचा कार्यकर्त्याला मलम लावतानाचा एक व्हिडीओ (Video) अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी शेअर केलाय. या व्हिडीओ राज ठाकरे चक्क मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) एका कार्यकर्त्याच्या खांद्याला मलम लावून देत असल्याचं दिसून आलंय. राज ठाकरे यांच्या मुंबईतील (Mumbai) नव्या ‘शिवतीर्थ’ या (Shivteerth) निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान हा किस्सा घडलाय.

Latest Videos