गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या राज ठाकरे यांच्या अटकेच्या मागणीवर मनसे नेता म्हणाला, सध्या त्यांची प्रॅक्टिस…
VIDEO | टोल नाक्यावरील टोल दरवाढी संदर्भात मनसे चांगलीच आक्रमक झालीये, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल होत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय केलं भाष्य? बघा व्हिडीओ
मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | टोल दरवाढीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी इशारा दिला की, जर लहान वाहनांकडून टोल आकारला तर सर्व टोल नाका जाळून टाकू असं वक्तव्य केल्यामुळे गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या वक्तवावर कष्टकरी जनसंघ हे हिंदू राष्ट्र भाषा मानणारा आहे, असे सदावर्ते यांनी म्हटले असून यापुढे कोणतीच दादागिरी पुढे चालू देणार नाही खपून देणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांना सदावर्ते यांनी दिला आहे. इतकंच नाहीतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल होत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचे पाहायला मिळाले. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केले आहे. काय म्हणणं काय त्यांचं…, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी सध्या त्यांची प्रॅक्टिस बंद आहे. त्यामुळे त्यांना गांभीर्यानं घ्यायची आवश्यकता नाही. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे म्हटले.