'महाराष्ट्रात नारळ फोडायची परंपरा, पक्ष फोडायची नाही', मनसे नेत्यानं कुणावर केली खोचक टीका?

‘महाराष्ट्रात नारळ फोडायची परंपरा, पक्ष फोडायची नाही’, मनसे नेत्यानं कुणावर केली खोचक टीका?

| Updated on: Aug 30, 2023 | 4:15 PM

VIDEO | उद्या आणि परवा होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर 'या' मनसे नेत्याची सडकून टीका, म्हणाले, 'इंडिया आघाडीची बैठक संपल्यावर यापैकी किती जण मिस्टर इंडिया होतायत हे बघणं म्हणत्त्वाचं'

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३ | राज्यभरात नारळीपौर्णिमेचा उत्साह मोठा असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच रक्षाबंधन हा सण देखील मोठ्या आनंदात साजरा होत आहे. नारळीपौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात किंवा समु्द्र किनारी जाऊन नारळ फोडतात. यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज भाष्य केले आहे. संदीप देशपांडे म्हणाले, ‘महाराष्ट्रात नारळ फोडायची परंपरा आहे. पण सध्या राज्यात पक्ष फोडले जात आहेत. या नारळ फोडण्याच्या स्पर्धेच्या निमित्ताने मला आठवण करून द्यायची आहे की, परंपरा नारळ फोडण्याची आहे पक्ष फोडण्याची नाही’, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. तर मुंबईत उद्या आणि परवा असे दोन दिवस INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महत्त्वाचे नेते मुंबईत दाखल होत आहेत. देशातील 26 विरोधी पक्षांची मिळून इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीआधी संयोजक पदाची चर्चा आहे. कारण अजून संयोजक पदाबाबत निर्णय झालेला नाही तो या बैठकीत होणार आहे, यावर संदीप देशपांडे यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, ‘त्यांनी या सभेला नाव इंडिया दिले आहे. पण आपल्याला बघावे लागेल की बैठक संपल्यावर यापैकी किती जण मिस्टर इंडिया होत आहेत.’, खोचक टोला लगावला आहे.

Published on: Aug 30, 2023 04:15 PM