मर्दांसारखे आमदारकीवर लाथ मारणार? की…, मनसे नेत्याचा ठाकरे गटावर जोरदार निशाणा
VIDEO | शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गट पाळणार का? मनसे नेते संदीप देशपांडे यांचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करत सवाल
मुंबई : ‘जर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रिय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे दिला नाही तर उद्धव ठाकरे गट शिंदे गटाचा व्हीप पाळणार आहात का? का ठाकरे गट राजीनामा देणार नेमकं काय करणार ते स्पष्ट करावे’, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. ‘ठाकरे गट लाचारी म्हणून तो व्हीप पाळणार की स्वाभिमान म्हणून लाथ मारणार? उद्धव ठाकरे यांच्याच भाषेत विचारायचे झाले तर नामर्दासारखे शिंदे गटाचा व्हिप पाळणार का? की मर्दानासारखे आमदारकीवर लाथ मारणार आहात?’ अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

