Sharad Pawar | ...म्हणून शरद पवार यांनी हा मास्टर स्ट्रोक खेळला, मनसे नेत्यानं थेट कारणचं सांगितलं

Sharad Pawar | …म्हणून शरद पवार यांनी हा मास्टर स्ट्रोक खेळला, मनसे नेत्यानं थेट कारणचं सांगितलं

| Updated on: May 03, 2023 | 8:51 AM

VIDEO | शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याच्या निर्णयावर मनसेची पहिली प्रतिक्रिया

ठाणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. त्यांचं वय आणि त्यांना असलेला आजार पाहता यासाठी कुठेतरी थांबायला हवं यासाठी ते थांबले असावेत, असे सांगत त्यांच्यावरती कोणतंही भाष्य करणे एवढा मोठा मी नाही. मात्र ज्या हालचाली चालल्या होत्या. जे ऐकायला येत होते अफवा असतील कदाचित, त्या कुठेतरी थांबव्यात यासाठी शरद पवार यांनी खेळलेला हा मास्टर स्ट्रोक असेल. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यावरही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं त्यावर बोलताना राजू पाटील म्हणाले, हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे तो अनेक अंगानी असू शकतो ते पवार साहेब आहे त्यांच्याबद्दल काय बोलणार असे सांगत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

Published on: May 03, 2023 08:40 AM