सत्तेचा अमरपट्टा घेऊन आले नाही, राज ठाकरे यांनी भाजपला नेमका काय दिला इशारा?
VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोर्चा भाजप आणि अजित पवार यांच्याकडे, भाजप आणि शिवसेनेसोबत अजित पवार गट सोबत आलाय. त्यामुळे सरकार भक्कम पण राज ठाकरे म्हणतात....लोकांना राग का येत नाही? काय म्हणाले राज ठाकरे? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १९ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवासांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा जुन्या मोडमध्ये आलेत. भाजप आणि अजित पवार यांच्या दिशेने राज ठाकरे यांनी आपला मोर्चा वळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ७० कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप करतात आणि पुन्हा अजित पवारांना सोबत घेतात, अशी टीकाच राज ठाकरे यांनी केली आहे. पिंपरीतून पत्रकार पुरस्कार सोहळ्यातून राज ठाकरे चांगलेच बरसले. शरद पवार यांच्यावर आरोप करणारे संतापाची भाषा करत आहेत, असा प्रतिसवाल भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. तर अजित पवार यांना मविआनेच क्लिनचीट दिल्याचे म्हटलंय. तर यावर स्वतः अजित पवार यांनी क्लिनचीट मिळाली नसून चौकश्या सुरू असल्याचे म्हटले होते. भाजप आणि शिवसेनेसोबत अजित पवार गट सोबत आलाय. त्यामुळे सरकार भक्कम झालंय. मात्र सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही येत नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी भाजपला दिलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…