अद्या, पद्या, अंड्या असं ऑन स्टेज तुम्ही बोलतात; भर मुलाखतीत राज ठाकरे भडकले

अद्या, पद्या, अंड्या असं ऑन स्टेज तुम्ही बोलतात; भर मुलाखतीत राज ठाकरे भडकले

| Updated on: Jan 07, 2024 | 5:08 PM

महाराष्ट्रातील मराठी माणूस इतिहास विसरत चालला आहे असे म्हणत राज ठाकरे हे मराठी कलाकारांवरच भडकल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांचे कान टोचले. राज ठाकरे म्हणाले, बाहेरच्या राज्याच्या कलावंताना भेटतो. त्यात मला काही चुका दिसतात. माझ्यावर विश्वास ठेवा...

पुणे, ७ जानेवारी, २०२४ : महाराष्ट्रातील मराठी माणूस इतिहास विसरत चालला आहे असे म्हणत राज ठाकरे हे मराठी कलाकारांवरच भडकल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांचे कान टोचले. राज ठाकरे म्हणाले, बाहेरच्या राज्याच्या कलावंताना भेटतो. त्यात मला काही चुका दिसतात. माझ्यावर विश्वास ठेवा. मी मराठी कलावंतांची बैठक बोलावणार होतो. आज सर्व कलावंत इथे आहे. मी जे बोलतो ते कृपा करून ऐका. पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट. तुम्ही एकमेकांना मान दिला नाही… तुम्ही एकमेकांसमोर अद्या पद्या शेळ्या मेंढ्या अशा नावाने हाक मारत राहिला… पष्प्या आलाय… अंड्या आलाय… हे तुम्ही ऑन स्टेज लोकांसमोर बोलता. आज मराठी चित्रपटक्षेत्रात पाहिलं तर स्टार नाही. कलावंत आहेत. मराठी सिनेमाला स्टार नाही. तामिळ तेलगू घ्या तिथे स्टार आहे. महाराष्ट्रात स्टार होते. आजही अनेक कलावंतात सर्व गुण आहेत. आपण एकमेकांना पब्लिकमध्ये शॉर्टफॉर्म नावाने हाक मारतात. अंड्या काय पचक्या काय. तुम्ही तुमचा मान राखला नाही तर लोक तुम्हाला का मान देतील, असे राज ठाकरे यांनी भर मुलाखतीत मराठी कलाकारांना आवाहन केले आणि खडसावले.

Published on: Jan 07, 2024 05:08 PM