मग आज का मोर्चा काढला? धारावीसाठी काढलेल्या मोर्चावरून राज ठाकरे यांचा ठाकरेंना खोचक सवाल
धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अदानी ग्रुपकडे देण्याला विरोध करत ठाकरे गट रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. तर ठाकरे गटाच्या या मोर्च्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडीच्या लोकांना आज का जाग आली? असा सवाल करत सेटेलमेंट नीट होत नाही म्हणून हा मोर्चा काढल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले
मुंबई, १८ डिसेंबर २०२३ : धारावी विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन गौतम अदानी आणि सत्ताधाऱ्यांविरोधात उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढला आहे. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अदानी ग्रुपकडे देण्याला विरोध करत ठाकरे गट रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. तर ठाकरे गटाच्या या मोर्च्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. मुंबईत एक मोठा प्रकल्प येत आहे. हा प्रकल्प अदानींना का दिला? अदानींकडे असं काय आहे? की तेच हाताळू शकतात. टाटांपासून इतरही लोक उद्योगात आहेत. त्यांच्याकडून डिझाईन मागवू शकत होते. टेंडर मागवू शकत होते. पण तसं झालं नाही. अदानी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशीही बोलणं झालं होतं. मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडचं डिझाईन दाखवा. महाविकास आघाडीच्या लोकांना आज का जाग आली? असा सवाल करत सेटेलमेंट नीट होत नाही म्हणून हा मोर्चा काढल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आणि टीकास्त्र सोडलं.