AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Patil : कुणाल कामराचे मनसे नेत्याकडून आभार; म्हणाले...'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...

Raju Patil : कुणाल कामराचे मनसे नेत्याकडून आभार; म्हणाले…’ते’ गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा…

| Updated on: Mar 27, 2025 | 11:45 AM

कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उपहासात्मक गाणं तयार केलं होतं. त्यानंतर शिवसैनिक चांगलेच भडकले होते. यानंतर त्यांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. यानंतर त्याने निर्मला सितारामण यांच्यावरही गाणं केल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांच्याकडून स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा याचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत राजू पाटील यांनी कुणाल कामरा यांना धन्यवाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. राजू पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून कुणाल कामराचं एक गाणं शेअर करत कुणाल कामराचे आभार व्यक्त केले आहे. राजू पाटील यांनी ट्वीटर अर्थात एक्स या सोशल मीडिया साईटवरील त्यांच्या अकाऊंटवर कुणाल कामराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी कुणाला कामराला टॅगही केले असून, डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल त्यांनी कुणालला धन्यवाद दिले आहेत. “इन सडकोंकी बरबादी करने सरकार है आई.. मेट्रो है इनके मन मैं, खोद कर ये ले अंगडाई.. ट्राफिक बढाने ये है आई,ब्रिजेस गिराने ये है आई… कहते है इसको, तानाशाही”, असे कुणाल कामरा याच्या गाण्याचे बोल आहेत. हेच गाणं राजू पाटील यांनी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Mar 27, 2025 11:30 AM