मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम तर राज ठाकरेंच्या भूमिकेला सदावर्तेंचा विरोध
'राज ठाकरे सुद्धा एक सामान्य भारतीय नागरिक असू शकतो. त्यांची टोळकी जमून बँकेत जाताय, बँकेच्या अधिकाऱ्यांना धमकवता, महिलांना माफी मागायला लावतात. कर्मचाऱ्यांना मारता, तुम्ही न्याय देवता आहेत का? हे चालणार नाही'- गुणरत्न सदावर्ते
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीवरून बँकांमध्ये तपासणी करा, असे आदेशच मनसैनिकांना दिलेत. यानंतर मनसैनिकांकडून थेट बँकांमध्ये धडक देऊन बँकांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तर अशी दमदाटी चालणार नाही, असं म्हणत पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. राज ठकारेंच्या आदेशानंतर मुंबईतील आयडीबीआय बँकेत मनसैनिकांनी पाहणी करत १५ दिवसांचा अल्टिमेटम दिल्याचे पाहायला मिळाले. तर ठाण्यातील कर्नाटक बँकेत जाऊन मनसैनिकांनी नोटीस बोर्डपासून बँकिंग व्यवहार मराठीत करण्यासाठी एक निवेदन देत १५ दिवसांची मुदत दिली. दुसरीकडे सोलापुरातही महाराष्ट्र बँकेत मनसे कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्यासह व्यवहारा देखील मराठी करण्यात यावे अशी मागणी करत मराठीत व्यवहार करा असे पोस्टर बँकेबाहेर लावलेत. दरम्यान, मनसेच्या या भूमिकेवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला. इतकंच नाहीतर आपण कायदेशीर मार्गाने लढणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. ‘राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार नाहीत. राज ठाकरेंची टोळकी बँकांमध्ये जाऊन धुडगूस घालते आहे’, असे सदावर्ते म्हणाले.

पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा

परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस

पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन

काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
