मनसेनं दम भरला अन् ‘एकदा येऊन तरी बघा’ मराठी चित्रपट पडद्यावर झळकला

मनसेनं दम भरला अन् ‘एकदा येऊन तरी बघा’ मराठी चित्रपट पडद्यावर झळकला

| Updated on: Dec 10, 2023 | 4:21 PM

थिएटरच्या स्क्रीनवर मराठी चित्रपट लागला पाहिजे आणि मराठी माणसांची गळचेपी आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी या पत्रामध्ये दिला होता. मनसेच्या या पत्रानंतर चित्रपटगृहात प्रसाद खांडेकर स्टारर ‘एकदा येऊन तरी बघा’ चित्रपटाचा शो लावण्यात आला

मुंबई, १० डिसेंबर २०२३ : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मराठी सिने कलाकार प्रसाद खांडेकर यांच्या एकदा येऊन तरी बघा या चित्रपटाला थिएटर मालक स्क्रिन नकारात आहे, हा प्रश्न उपस्थित केला होता. तर ‘मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. पण ते थिएटर उपलब्ध करून दिले जाईल…’ असं देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात उत्तर दिलं होतं. या मुद्यावरून आत्ता मनसेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. चेंबूर मनसे विभागाध्यक्ष माऊली थोरावे यांनी चेंबूर भागातील के स्टार आणि क्यूबिक मॉल च्या चित्रपट गृहाच्या मालकाना पत्राद्वारे निवेदन देण्यात आलं आहे. थिएटरच्या स्क्रीनवर मराठी चित्रपट लागला पाहिजे आणि मराठी माणसांची गळचेपी आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी या पत्रामध्ये दिला होता. मनसेच्या या पत्रानंतर चित्रपटगृहात प्रसाद खांडेकर स्टारर ‘एकदा येऊन तरी बघा’ चित्रपटाचा शो लावण्यात आला आहे.

Published on: Dec 10, 2023 04:21 PM