एक दिवस महाराष्ट्रात असा येईल, सर्व नेते महायुतीच्या स्टेजवर असतील, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
महायुतीच्या आज मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ही संयुक्त पत्रकार परिषद होती. भाजचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे नेते दादा भुसे हे यावेळी उपस्थित होते.
मुंबई, ३ जानेवारी २०२४ : आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीने आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ही संयुक्त पत्रकार परिषद होती. भाजचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे नेते दादा भुसे हे यावेळी उपस्थित होते. या तिघांनीही आगामी लोकसभा निवडणुकीच्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘लोकसभेत ४५ हून जास्त जागा महाराष्ट्रात जिंकणार आहे. तर विधानसभेत २२५ जागा जिंकणार आणि तिनही पक्षांनी याची तयारी सुरू केली आहे’, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले तर फेब्रुवारीत राज्यभर महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे होणार असून महायुतीचे नेते या मेळाव्यांना हजर राहणार आहेत. पुढे बावनकुळे असेही म्हणाले. मी दाव्याने सांगतो की ४५+ जागा महायुती जिंकेल. मोदींचं वादळ येईल आणि मविआचा सर्व पाळापाचोळा साफ करेल. अनेक लोक आमच्या महायुतीत यायला लाईनमध्ये आहेत. एक दिवस महाराष्ट्रात असा येईल की सर्व नेते हे महायुतीच्या स्टेजवर असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.