Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणजितसिंह निंबाळकरांचे निकटवर्तीय दिगंबर आगवणेंची तक्रार, निंबाळकरांनी फसवणूक केल्याचा आरोप

| Updated on: Mar 02, 2022 | 10:57 AM

माढा (Madha) मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांनी 3 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप फलटणमधील उद्योजक आणि त्यांचे निकटवर्तीय असलेले दिगंबर आगवणे (digambar aagawane) यांनी केला आहे.

माढा (Madha) मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांनी 3 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप फलटणमधील उद्योजक आणि त्यांचे निकटवर्तीय असलेले दिगंबर आगवणे (digambar aagawane) यांनी केला आहे. याबाबत दिगंबर आगवणे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्याकडे अर्ज करून रितसर तक्रार नोंदवलेली आहे. केलेल्या तक्रारी अर्जात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दिगंबर आगवणे यांच्यामध्ये गेल्या दहा वर्षात अनेक आर्थिक व्यवहार झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या व्यवहारांमध्ये 3 कोटी 40 लाख रुपये खा.निंबाळकर यांच्याकडून येणे अपेक्षित असताना ते मिळालेले नाहीत त्यामुळे जर मला न्याय मिळाला नाही तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिगंबर आगवणे यांनी सांगितले आहे.