श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी दिली- संजय राऊत

श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी दिली- संजय राऊत

| Updated on: Feb 21, 2023 | 3:10 PM

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पाहा ते काय म्हणालेत...

मुंबई : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ल्याचा कट आखल्याचा संजय राऊत यांनी पत्रात दावा केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजा ठाकूरला आपल्यावर हल्ला करण्याची जबाबदारी दिली असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी दिली, असा थेट आणि गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Published on: Feb 21, 2023 03:01 PM