Vinayak Raut : कपबश्या विकायचो, आज खासदार… फक्त बाळासाहेबांमुळेच; विनायक राऊत भावूक
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे काही किस्से सांगितले आहेत. ते म्हणाले, बाळासाहेबांच जाण हे आमच्यासाठी शल्य आहे. तर बाळासाहेबांंचं पितृतुल्य प्रेम विसरणं अशक्य आहे.
मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३ : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे काही किस्से सांगितले आहेत. ते म्हणाले, बाळासाहेबांच जाण हे आमच्यासाठी शल्य आहे. शिवसेना हा पक्ष नाही तर कुटुंब आहे आणि सगळ्याचं रक्षण करणारा आदर्श पिता म्हणून बाळासाहेब होते. त्यांच्यासोबतचे खूप किस्से आहेत पण राजकारणाची जेव्हा मला अक्कल आली तेव्हापासून माझं आकर्षण हे बाळासाहेब होते. मी मुंबईत आल्यानंतर मी स्वतः दादरच्या रस्त्यावर कपबशा विकत होतो. रात्र शाळा करून हे काम करत होतो, तेव्हा बाळासाहेबांनी मला आधार दिला आणि तेव्हा मला शाखाप्रमुख केलं. बाळासाहेबांंचं पितृतुल्य प्रेम विसरणं अशक्य असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटलंय. मी विधानपरिषदेचा आमदार झालो, तेव्हा बाळासाहेबांनी मला विचारलं की, आता काय करतो? आणि आता कोकणाकडे लक्ष दे. तेव्हापासून मी कोकणाकडे लक्ष द्यायला सुरवात केली. माझा विजय झाला तेव्हा उद्धव ठाकरे रत्नागिरीला आले होते. तो माझा आनंदाचा दिवस होता, असे म्हणत त्यांनी आठवणी सांगितल्या.