MPSC Exam : राज्य सेवा पूर्व परीक्षेचं एमपीएससीकडून आयोजन, 2 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

MPSC Exam : राज्य सेवा पूर्व परीक्षेचं एमपीएससीकडून आयोजन, 2 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

| Updated on: Jan 23, 2022 | 10:37 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीनं आज राज्य सेवा पूर्व परीक्षेचं आयोजन केलं जात आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 390 जागांसाठी आयोजित करण्यात येत आहे. आजच्या परीक्षेसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीनं आज राज्य सेवा पूर्व परीक्षेचं आयोजन केलं जात आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 390 जागांसाठी आयोजित करण्यात येत आहे. आजच्या परीक्षेसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. आज राज्यभरात एमपीएससीची पूर्व परीक्षा राज्यातील एकूण 36 जिल्हा केंद्रावर परीक्षा होणार आहे. राज्यात एकूण 2 लाख 22 हजार 395 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. 390 पदांसाठी 2021 च्या जाहीरातीनुसार परीक्षा होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतोय.