MPSC | एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिला 'हा' दिलासा

MPSC | एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिला ‘हा’ दिलासा

| Updated on: Sep 08, 2023 | 2:23 PM

VIDEO | राज्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांकरता मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देत २०१९ ला रद्द झालेल्या जिल्हा परिषदेच्या भरती परीक्षाचं शुल्क परत मिळणार

मुंबई, ८ सप्टेंबर, २०२३ | एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. २०१९ ला रद्द झालेल्या जिल्हा परिषदेच्या भरती परीक्षाचं शुल्क परत करण्यात येणार आहे. जमा केलेल्या परीक्षा फी पैकी केवळ ६५ टक्के रक्कम परत करण्यात येणार आहे. तर १०० टक्के शुल्क परत करा, अशी मागणी रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. रद्द झालेल्या जिल्हा परिषद सरळसेवा परीक्षांचे शुल्क परत करण्यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. दिलेल्या शब्दाप्रमाणे शुल्क परत करण्यासंदर्भात परिपत्रक काढल्याबद्दल रोहित पवार यांनी आभारही मानले आहेत.

Published on: Sep 08, 2023 02:23 PM