मुंबईतील 'या' समुद्रकिनारी आलेत जेलीफिश,नागरिकांना पाण्यात न जाण्याचं आवाहन

मुंबईतील ‘या’ समुद्रकिनारी आलेत जेलीफिश,नागरिकांना पाण्यात न जाण्याचं आवाहन

| Updated on: Aug 12, 2023 | 4:29 PM

VIDEO | दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनारी जेली फीश दाखल होतात. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, आक्सा चौपाटी या प्रमुख ठिकाणी जेली फीशची दहशत असते. समुद्र किनाऱ्यावर जेलिफिश आल्याने पर्यटकांनी चौपाट्यांवर जेली फीश पासून स्वतःला वाचवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई, १२ ऑगस्ट २०२३ | मुंबईच्या जुहू बीचवर आज सकाळी जेलीफिश पसरल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनारी जेली फीश येतात. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, आक्सा चौपाटी या प्रमुख ठिकाणी जेली फीशची दहशत असते. आज सकाळीही जुहू बीचच्या किनाऱ्यावर जेलीफिश दिसले. जुहू बीचवर वेगवेगळ्या ठिकाणी जेलीफिश पसरले होते. सध्या जेलीफिश शूज आणि पायाला चिकटत असल्याने पर्यटकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जुहू बीचच्या किनाऱ्यावर जेलिफिश आल्याने पर्यटकांनी जुहू चौपाटी सह अन्य चौपाट्यांवर ब्ल्यू बॉटल जेली फीश पासून स्वतःला वाचवावे, असे आवाहन जुहू चौपाटीचे जीवरक्षक रवि वाढवे यांनी पर्यटकांना केले आहे.

Published on: Aug 12, 2023 04:29 PM