नादच खुळा… रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा ‘रॉयल’ थाट; बघा व्हिडीओ
राज्यभरात गेल्या दहा दिवस जल्लोषात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतील परळ गिरगाव यासारख्या भागात गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम गेले दहा दिवस पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवात संपूर्ण दहा ते अकरा दिवस मनोभावे पूजा, आर्चना आणि मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पला जड अंतःकरणाने निरोप दिला जात आहे. कुठे ढोल-ताशा, कुठे मावळ पथक तर कुठे भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देत विसर्जन मिरवणुका सुरू आहे. मात्र मुंबईत एका घऱगुती बाप्पाचा थाट काही औरच पाहिला मिळाला. गणपती बाप्पाला निरोप देताना गणपती बाप्पा रथ, गाडी, टेम्पो सोडून थेट रोल्स-रॉईस सारख्या महागड्या गाडीत विराजमान झाला होता. या महागड्या रोल्स-रॉईस गाडीमधून बाप्पाची विसर्जन मिरवणूक पाहायला मिळाली. मुंबईतील जैन परिवाराच्या वतीने रोल्स-रॉईसमध्ये गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. गेल्या अकरा वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारे गणपतीचे विसर्जन मिरवणूक जैन परिवार करत असल्याचे त्यांनी सांगितले.