मुसळधार पाऊस! वडाळा स्टेशनला जाण्याआधी पाण्यातून जायचं…
Mumbai Rains: पाणी साचल्यामुळे याचा फटका वाहनधारकांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करावा लागतो त्यामुळे रेल्वे प्रवाशांना देखील मार्ग काढत जावं लागत आहे
मुंबई: महाराष्ट्रात मुसळधार पावसाची (Mahrashtra Rain Updates) शक्यता वर्तविण्यात आलीये. हवामान खात्याने मुंबईला 14 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केलाय. मुंबईत पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. माटुंगा सायन गांधी मार्केट रस्त्यावर पाणी साचून रस्त्यांना तलावाचा स्वरूप आलंय. वडाळा (Wadala) परिसरात देखील पाणी साचलंय. इथे वडाळा स्टेशन समोरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पाणी साचल्यामुळे याचा फटका वाहनधारकांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करावा लागतो त्यामुळे रेल्वे प्रवाशांना (Railway Station) देखील मार्ग काढत जावं लागत आहे
Published on: Jul 12, 2022 11:32 AM
Latest Videos