Kishori Pednekar | कोरोनाच्या लाटेपासून आपला महाराष्ट्र आणि आपली मुंबई सांभाळूया : किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar | कोरोनाच्या लाटेपासून आपला महाराष्ट्र आणि आपली मुंबई सांभाळूया : किशोरी पेडणेकर

| Updated on: Jan 07, 2022 | 12:10 PM

नागरिकांनी घरात बसायची वेळ नाही पण स्वत: ला सांभाळण्याची वेळ असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. आपला महाराष्ट्र आणि आपली मुंबई सांभाळूया, असं पेडणेकर म्हणाल्या. सध्यातरी लोकलप्रवासाबाबत निर्णय नाही, असंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्र्याचा विचार घेऊनच निर्बंधांबाबत विचार करण्यात येणार आहे. रेल्वेमधील गर्दी, बेस्टमधील गर्दी पाहता डॉक्टर आणि कर्मचारी बाधित होत आहेत ही गंभीर बाब आहे. मुंबईत मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झालीय, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. विकेंडला ठिकठिकाणी गर्दी, मार्केटमधील गर्दी, रस्त्यावर विक्रेत्यांना ना ग्राहकांना चिंता, अशी परिस्थिती दिसून येत आहे. नागरिकांनी घरात बसायची वेळ नाही पण स्वत: ला सांभाळण्याची वेळ असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. आपला महाराष्ट्र आणि आपली मुंबई सांभाळूया, असं पेडणेकर म्हणाल्या. सध्यातरी लोकलप्रवासाबाबत निर्णय नाही, असंही त्या म्हणाल्या.

Published on: Jan 07, 2022 10:25 AM