Nashik Fog Video : दाटले रेशमी आहे धुके धुके, मुंबई-नाशिक महामार्गावरवर धुक्याची चादर
धुक्याची चादर ओढून मुंबई नाशिक हायवे अतिशय सुंदर दिसतोय. हायवेवर या सुंदर दिसणाऱ्या धुक्यात गाड्या सुद्धा हेड लाईट बंद करून शांतपणे मार्गस्थ होत आहेत.
मुंबई: मुंबईत जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु झालाय. नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. नागरिकांचे हाल होत आहेत. पण मुंबई नाशिक हायवे (Mumbai Nashik Highway) वर मात्र वेगळं चित्रं आहे. धुक्याची चादर ओढून मुंबई (Mumbai) नाशिक हायवे अतिशय सुंदर दिसतोय. वाहनचालक वाहने थांबवून निसर्गाचा आनंद लुटताना दिसतायत. पहाटे धुक्याने आच्छादलेला निसर्गाचं अद्भुत रूप पाहायला मिळालंय. हायवेवर या सुंदर दिसणाऱ्या धुक्यात गाड्या सुद्धा हेड लाईट बंद करून शांतपणे मार्गस्थ होत आहेत. हायवे कमी आणि पर्यटनस्थळ जास्त वाटणारा हा मुंबई नाशिक हायवे शांतपणे वाहतोय.
Published on: Jul 05, 2022 12:15 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

