मुंबईकरांच्या दुधात भेसळ! तब्बल 1 हजार लीटर भेसळयुक्त दूध जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईकरांच्या दुधात भेसळ! तब्बल 1 हजार लीटर भेसळयुक्त दूध जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

| Updated on: Sep 16, 2022 | 6:25 AM

या दुधाची किंमत 60 हजार 600 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या सहा जणांची आता पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईकरासांठी (Mumbai crime News) महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत दुधात (Milk) भेसळ करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुधात चक्क दूषित पाणी मिसळून भेसळ केली जात असल्याचं समोर आलंय. मुंबईच्या शाहूनगर धारावी परिसरात पोलिसांनी (Police) दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईमध्ये तब्बल 1 हजार लीटर दूध जप्त करण्यात आलं आहं. या दुधाची किंमत 60 हजार 600 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या सहा जणांची आता पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय. या कारवाईमुळे मुंबईत दूधविक्री करताना दुधात भेसळ करणाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. आता अटक करण्यात आलेल्या सहा जणांच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Sep 16, 2022 06:22 AM