ST Employee Strike | आझाद मैदानावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, आंदोलकांनी बाहेर पडू नये यासाठी तटबंदी
ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेलं एसटी कर्मचारी आंदोलन अजूनही सुरुच आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मागील 11 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.
ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेलं एसटी कर्मचारी आंदोलन अजूनही सुरुच आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मागील 11 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. मात्र, सरकारकडून अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीकडे लक्ष दिलं जात नाही. अशावेळी गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाची आजची दिशा जाहीर केली. एसटीच्या महिला कर्मचारी दुपारी चार वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर जात परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार असल्याचं पडळकरांनी सांगितलं होतं. पडळकरांच्या या घोषणेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झालं आहे. पोलीस प्रशासनानं आझाद मैदानात पोलिसांची संख्या वाढवली आहे. पोलिसांनी आझाद मैदानातून आंदोलक बाहेर पडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Latest Videos