Mumbai Rains: पाण्यात स्कूल बस अडकली!
Mumbai Rains: नवी मुंबई भागात पाणी साचायला सुरुवात झालीये. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
मुंबईः मुंबईसह (Mumbai) उपनगरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडत असल्याने परिसरातील अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दहीसर, कांदिवली, मालाड, गोरेगांव आणि अंधेरी येथील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्याचा फटका परिसरातील अनेक नागरिकांना बसला आहे. नवी मुंबई भागात पाणी साचायला सुरुवात झालीये. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान एक शाळेची बस (School Bus) या पावसाच्या साठलेल्या पाण्यात अडकली आहे. ती बस जागेवरच उभी आहे. स्थानिक नागरिकांकडून बस त्या पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Latest Videos