MVA Manifesto 2024 : 'मविआ'चा महाराष्ट्रनामा, जाहीरनाम्यात 'या' पंचसूत्रीसह कोणत्या मोठ्या घोषणा?

MVA Manifesto 2024 : ‘मविआ’चा महाराष्ट्रनामा, जाहीरनाम्यात ‘या’ पंचसूत्रीसह कोणत्या मोठ्या घोषणा?

| Updated on: Nov 10, 2024 | 3:42 PM

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढील शंभर दिवसांचा कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात आला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज महाविकास आघाडीचा जाहीरनामा सादर केला. महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्रनाम्यात अर्थात जाहीरनाम्यात पंचसूत्रीसह काही मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत. महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये देण्यात येणार त्यासह महिला व मुलींसाठी मोफत बस सेवा देण्यात येणार, सहा गॅस सिलेंडर प्रत्येकी ५०० रूपयात देण्यात येणार आहे. कृषी समृद्धी योजनेंतर्हत शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४ हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यात येणार, राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती प्रक्रिया सुरू करणार, एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करून ४५ दिवसात निकाल जाहीर करणार, ३०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचे १०० युनिट वीज बिल माफ करणार, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार, सरकारी रूग्णालयात मोफत औषधं उपलब्ध करून देणार.

Published on: Nov 10, 2024 03:42 PM