Nagpur Crime | नागपुरात मित्रानेच मित्राला भोसकलं, क्राईम सिटीतल्या प्रकाराने महाराष्ट्र हादरला
नागपूरच्या ह्या घटनेचा व्हिडीओ हा 43 सेकंदाचा आहे. यात एक वीस बावीस वर्षाचा तरुण पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत दिसतो आहे. त्याच्या कपाळावर जखमा झालेल्या आहेत. खुपसलेल्या चाकुला त्यानं हातानं धरलं आहे.
एक विशीतला तरुण मुलगा आहे, त्याच्या पोटात चाकू खुपसलेला दिसतोय. तो तशाच अवस्थेत एका पोलीस ठाण्यात आल्याचा व्हिडीओ महाराष्ट्रासह देशभरात वेगानं व्हायरल झाला. आधी हा व्हिडीओ उत्तर प्रदेश, बिहारकडचा असेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. पण हा व्हिडीओ नागपुरचा असल्याचं आता उघड झालं आहे. जो तरुण पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचला त्याचं नाव विनय राबा असल्याचेही समजते. ही घटना नागपुरच्या कपिलनगर पोलीस ठाण्यातली आहे.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

