अवकाळीचा राज्यात धुमाकूळ, झाडं अन् भिंत कोसळून दोघांचा मृत्यू; कुठं घातलं पावसानं थैमान?
VIDEO | राज्यभरात अवकाळी पावसाचा फटका, सोसाट्याच्या वारा आणि पावसामुळे शहरातील अनेक भागात झाडं घडल्या कोसळून दुर्घटना
नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नागपूरच्या काही भागात चांगला तर काही भागात मात्र रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मात्र नागपूर ग्रामीण मधील नारखेड काटोल तालुक्यात काही गावांमध्ये चांगला पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाल्याने संत्र्याच्या पिकांना नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसापासून नागपुरात कडाक्याचं ऊन तापत आहे आणि त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात चांगलाच बदल झाल्याने आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवताना दिसताय. नागपुरात अवकाळी पावसासह वादळ,सोसाट्याचा वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागात झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या तर वाहनांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. यासह गोंडवाना चौकातील जेपी हाईट्स इमारतीची भिंत पडल्याने 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.