संजय राऊत यांच्याकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा 'तो' फोटो ट्विट; नाना पटोले यांनी काय केली मागणी?

संजय राऊत यांच्याकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा ‘तो’ फोटो ट्विट; नाना पटोले यांनी काय केली मागणी?

| Updated on: Nov 20, 2023 | 6:12 PM

महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊमध्ये जुगार खेळत आहेत असा गंभीर आरोप करत फोटो झुम करून बघा हे तेच महाशय आहेत ना? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी यावर भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी ट्वीट केलेला फोटोवर नेमकं काय म्हणाले?

मुंबई, २० नोव्हेंबर २०२३ : महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊमध्ये जुगार खेळत आहेत असा गंभीर आरोप करत फोटो झुम करून बघा हे तेच महाशय आहेत ना? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी यावर भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी ट्वीट केलेला फोटो तपासला गेला पाहिजे, तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय मार्फत याची चौकशी करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. बावनकुळे यांच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना ते असेही म्हणाले, संजय राऊत यांनी ट्वीट केलेला फोटो गंभीर आहे. एकीकडे राज्यात दुष्काळीची गंभीर परिस्थिती आहे. तर अशा या परिस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष मकाऊमधील कॅसिनोमध्ये जुगार खेळत असतील तर त्याचा तपास हा झालाच पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.

Published on: Nov 20, 2023 06:12 PM