Nashik | नाशकात वडापावच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचा छापा
नाशिकच्या उत्तमनगर परिसरातील छोटू कोल्हापुरी या वडापावच्या दुकानावर नाशिकमधील अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी छापा टाकलाय. सदर दुकानामधील वडापाव आणि इतर वस्तू तसेच तेल याचे सॅम्पल सोबत घेऊन पंचनामा करण्यात आलाय.
नाशिक : नाशिकच्या उत्तमनगर परिसरातील छोटू कोल्हापुरी या वडापावच्या दुकानावर नाशिकमधील अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी छापा टाकलाय. सदर दुकानामधील वडापाव आणि इतर वस्तू तसेच तेल याचे सॅम्पल सोबत घेऊन पंचनामा करण्यात आलाय. छोटू कोल्हापुरी या दुकानावर कारवाईदेखील करण्यात आलीय. छोटू कोल्हापुरी या दुकानात वडापाव तळताना वापरण्यात येणारे तेल हे बदलले जात नाही. तसेच वडापाव चिकी टिक्की ही डीप फ्रिझरमध्ये 5 ते 6 दिवसांपर्यंत ठेवलेली असते म्हणजेच शिळे वडे पाव लोकांना खायला दिले जातायत, असा आरोप केला जात आहे.
Latest Videos