हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?

हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?

| Updated on: May 02, 2024 | 10:37 AM

शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना लोकसभेचं तिकीट जाहीर करण्यात आलंय. पण शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या शांतीगिरी महाराज यांनी दंड थोपटलेत. लढणार आणि जिंकणार म्हणत शांतिगिरी महाराज यांनी आव्हान उभं केलंय. इतकंच नाहीतर लढणार आणि जिंकणार यावर शांतीगिरी महाराज ठाम आहेत

नाशिकमधून अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना लोकसभेचं तिकीट जाहीर करण्यात आलंय. पण शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या शांतीगिरी महाराज यांनी दंड थोपटलेत. लढणार आणि जिंकणार म्हणत शांतिगिरी महाराज यांनी आव्हान उभं केलंय. शिंदे गटाने त्यांच्या गोटातून काल तीन उमेदवार जाहीर केलेत. कल्याणमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यातून नरेश म्हस्के आणि नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली. नाशिकमध्ये महिन्याभरापासून रस्सीखेच सुरू होती पण ही जागा शिंदेंकडे येण्यासह हेमंत गोडसे यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली. यानंतर शांतीगिरी महाराज आणि अनिकेत शास्त्री यांनीही अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. इतकंच नाहीतर लढणार आणि जिंकणार यावर शांतीगिरी महाराज ठाम आहेत आणि अनिकेत शास्त्री यांनी गोडसेंना पाठिंबा दिलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: May 02, 2024 10:36 AM