नाशिकच्या सटाणा येथे खासगी गाड्यांसह एसटी बसवर दगडफेक, काय आहे कारण?

नाशिकच्या सटाणा येथे खासगी गाड्यांसह एसटी बसवर दगडफेक, काय आहे कारण?

| Updated on: Jul 30, 2023 | 8:57 AM

VIDEO | नाशिकच्या सटाणा येथे तणावपूर्ण परिस्थिती, वंचित बहुजन आघाडी आणि आदिवासी संघटना आक्रमक, काय आहे कारण?

नाशिक, 30 जुलै 2023 | मणिपूर राज्यातील महिला अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकच्या सटाणा शहरात समविचारी संघटनांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. शहरातील शहरातील बाजार पेठेपासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तहसील कार्यालय परिसरात मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी मणिपूर आणि केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारचा निषेध करतानाच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, दोषींना कडक शिक्षा द्यावी, मणिपूर मधील घटनेने देशाची जगात नाचक्की झाली आहे. त्यामुळे या घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन निःपक्षपाती कारवाई करुन गुन्हेगाराना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले. दरम्यान, मणिपूर घटनेच्या निषेधार्थ सटाणा शहरात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. या मोर्चातील काही तरुणांनी अचानक घोषणाबाजी देत एसटी महामंडळाच्या बस सोबत खाजगी वाहनांवर दगडफेक केली. यात वाहनांचे नुकसान तर झालंच मात्र तीन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज देखील केल्याची माहिती मिळतेय.

Published on: Jul 30, 2023 08:57 AM