Special Report | पुतळ्याची परवानगी नेमकी कुणी रखडवली?-TV9

Special Report | पुतळ्याची परवानगी नेमकी कुणी रखडवली?-TV9

| Updated on: Jan 16, 2022 | 8:42 PM

अमरावती महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे, मग पुतळ्याला परवानगी तर पालिकेने नाकरली, मग त्यानंतरही राणांच्या टार्गेटवर पुन्हा उद्धव ठाकरे का? मग या पुतळ्यामागचे राजकारण काय? असा सवाल उपस्थित होणे साजिकच होते आणि आता हाच वाद वाढण्याची शक्यता आहे.

अमरावती : पहाटेच्या थंडीत अमरावतीतल्या राजकारणात ठिणग्या उडत आहेत. कारण महापालिकेने परवानगी न देता छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji mahraj) पुतळा बसल्याने, पहाटे मोठ्या पोलीस बंदोबस्तात पालिकने हा पुतळा हटवला. त्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet rana) आणि रवी राणा (Ravi rana) गप्प बसतील असे कसे होईल? त्यांना आणखी एक चान्स मिळाला ठाकरे सरकारला टार्गेट करण्याचा आणि काही वेळातच ते दिसून आले, कारण अमरावीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करत उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा घुमू लागल्या. मात्र अमरावती महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे, मग पुतळ्याला परवानगी तर पालिकेने नाकरली, मग त्यानंतरही राणांच्या टार्गेटवर पुन्हा उद्धव ठाकरे का? मग या पुतळ्यामागचे राजकारण काय? असा सवाल उपस्थित होणे साजिकच होते आणि आता हाच वाद वाढण्याची शक्यता आहे.

Published on: Jan 16, 2022 08:41 PM